Friday, May 22, 2020

The beauty of the Handcrafted Jewellery



Jewellery is a must have accessory for both women and men. When combined wisely, it complements our outfit and overall personality. Every person wants a special piece of jewellery, having a unique design which gives her /him an extraordinary feeling. Hence many people are moving towards handcrafted jewellery rather than mass produced jewellery. Why people are giving a preference to handcrafted jewellery? Because, it is made by an artist where he/she uses his/her creativity to create a unique design. Each design is different. Handcrafted jewellery is produced without using mass manufacturing machines. Hence it is exclusive.
A simple hand assembled pendant or bracelet definitely stands apart from mass produced ones. Because, the artist puts his/ her efforts into each of the piece he designs. He makes each individual piece with his creativity using only his hands and some simple tools. That is the reason why nowadays, consumers prefer handcrafted jewellery because, they get a unique souvenir each time they buy the jewellery. Every piece of handmade jewellery has a little variation although they have the same style. When we manually make anything with our hands, we tend to make a little variation in the each piece we create. There might be slight imperfections too, as human cannot achieve the accuracy of the machine, but there is so much more to see in the piece of handcrafted jewellery. Jewellery artists mostly use the ethically sourced and sustainable material for their handcrafted jewellery. Hence this jewellery is authentic and durable too.
There are many types of handcrafted jewellery like a simple hand-assembled jewellery to intricate designs which may take hours to finish. Let us look at some popular types of handcrafted jewellery.
1.       Hand-assembled jewellery
This is a simplest type of handcrafted jewellery. This type of jewellery has unique and personalized items. It comes at an affordable price. Jewellery artists create trendy and beautiful earrings, necklaces, bracelets, anklets from pre-made chains, charms and jewellery supplies. If you want to start jewellery making, then this is the first step for you. There are many tutorials available online to learn hand-assembled jewellery with the use of simple tools. It is the simplest and easiest handcrafted jewellery you can make by using your creativity. You can design your own jewellery set for special occasions or you can gift the jewellery made by you to your loved ones as a heart-warming gift.

2.       Beaded jewellery
You can create a beautiful piece of handmade jewellery by using different kinds of beads. The jewellery can be the simple or an intricate piece of art depending upon which beads you are using. The artist may use the beads on a single strand of the wire or stringing material and create necklaces and bracelets or anklets. Many artists use various letters and numbers with precious beads to create personalised jewellery items. Fun shaped beads are used to make trendy, funky type of jewellery. Expert jewellery artists use very tiny beads to make larger and intricate designs. There are many types of beads available in the market ranging from sterling silver beads, copper beads, crystal beads, gemstone beads, wooden beads, clay beads, precious gemstone beads etc. Some artists make colourful and patterned beads using glass rods as well.  Beaded jewellery is colourful, trendy, classy and stylish.

3.       Fabricated Jewellery
Handcrafted fabricated jewellery is wildly popular these days. In this type of jewellery making, you must learn the skill of metalsmithing and jewellery bench skills as well. The artists cut out the basic shape of the piece and then carve the intricate design into the piece. Then they attach the components to each other by soldering. This require skill and lots of patience as fabrication takes lots of time. There are many institutes which give the training to the artists.  Once you learn the basic concept, you can use your skills to manipulate the metal in various ways to create a beautiful piece of art using specialized tools. With years and years of practice, you can create intricate designs of fabricated jewellery.

4.       Fabric Jewellery
Fabric Jewellery is an ancient type of jewellery which is popular even in 2020. There are many kinds of fabric jewellery ranging from felt to leather, silk, ribbon and crochet etc. Felting is a traditional fibre technique. Loose felt can be turned into many shapes which are used to make jewellery. Felt necklaces, felt earrings, felt bracelets are very popular today. Another example of fabric jewellery is bead embroidered jewellery. Tiny beads are sewn into fabric to make beautiful necklaces, bracelets, earrings and many more types of jewellery. In ancient times, deer skin was used to make jewellery. Nowadays, leather is used to make jewellery items. Leather cord is beautifully braided to make bracelets and necklaces, bands etc. Similarly, cotton and silk material along with ribbons are also used to make elegant bracelets, necklaces, earrings etc. The charms and pendants are also added to increase the beauty of the jewellery.  Crochet jewellery is also popular amongst the young generation.

5.       Wire wrapped jewellery
Handmade wire wrapped jewellery is trending today. The artists use wire wrapping to make pendants and charms using beads and precious stones. You can create delicate and intricate designs using wire wrapping. But mind you! Although it looks very elegant, it takes lots of time, efforts and patience to make delicate and beautiful wire wrapped jewellery. Depending upon your creativity, you can use different gauges of wire. For simple designs, you can use a thick gauge while intricate designs require to use delicate and extremely thin wires.

There are many other types of handcrafted jewellery like hand stamped, enamelled, engraved jewellery etc and each one of them has their own beauty. Every type of jewellery has a unique look and when combined with proper clothing, it provides you a rich elegant look. The experts make various kinds of beautiful handcrafted jewellery items ranging from bangles, charm bracelets, chain bracelets, beaded bracelets, leather bracelets and gemstone bracelets to silver necklaces, gemstone necklaces, beaded necklaces, bands, chokers, various kinds of rings, earrings and hoops etc. The talented artists pour their incredible efforts to create these beautiful pieces which are really worth the price. So just try the different types of handcrafted jewellery and upgrade your style!

Saturday, May 16, 2020

आणि सर विल्यम हर्षेलने युरेनस ग्रहाचा अपघाताने शोध लावला


सतरावे शतक उजाडले आणि आपल्या सूर्यमालेत शनीच्या पुढेही आणखी ग्रह आहेत ह्याचा शोध लागला. आजच्याच दिवशी म्हणजे १३ मार्च १७८१ रोजी सर विल्यम हर्षेलने त्याचे नेहमीचे निरीक्षण करता करता युरेनस ह्या ग्रहाचा शोध लावला होता. प्राचीन काळी शनी पर्यंत आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचे शोध लागल्यानंतर अनेक वर्षांच्या मोठ्या अंतराळानंतर सर विल्यम हर्षेलला एका नव्या ग्रहाचा शोध लागला. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर विल्यम हर्षेल हा त्याच्या दुर्बिणीतून सगळ्या ताऱ्यांचा सर्व्हे करीत होता. हे तारे कमीत कमी मॅग्निट्युड आठ चे होते. ताऱ्यांचे मॅग्निट्युड त्यांच्या प्रखरतेवर मोजतात. अतिशय प्रखर असलेले तारे हे फर्स्ट मॅग्निट्युड ह्या प्रकारात मोडतात आणि अतिशय मंद प्रकाश असलेले तारे जे नुसत्या डोळ्यांनी सुद्धा अवकाशात दिसतात ते सिक्स्थ मॅग्निट्युड ह्या प्रकारात गणले जातात. ही मॅग्निट्युड स्केल टॉलेमी आणि हिपेर्कसच्या काळापासुन आहे. ह्यांनी ताऱ्यांचे वर्गीकरण त्यांच्या मॅग्निट्युड प्रमाणे केले आहे. ह्याच प्राचीन स्केलप्रमाणे विविध ताऱ्यांचे त्यांच्या प्रखरतेनुसार वर्गीकरण केले जाते. ह्याच पद्धतीने आजही ताऱ्यांचे वर्गीकरण केले जाते ,अर्थात त्यात काही सुधारणा झाल्या आहेत पण ताऱ्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत आजही टिकून आहे.

तर सर विल्यम हर्षेल नेहमीप्रमाणे मॅग्निट्युड कमीत कमी आठ असणाऱ्या ताऱ्यांचे निरीक्षण करीत होते. हे तारे नुसत्या डोळ्यांना दिसणे कठीण असते  ह्यासाठी टेलिस्कोपचीच गरज असते. ताऱ्यांचे निरीक्षण करता करता त्यांना अवकाशात एक फिकट वस्तू आढळली. डोळ्यांना अगदी जेमतेम दिसू शकेल अशी ही अवकाशातील वस्तू निश्चित ठिकाणी कायम असणाऱ्या आणि कधीही जागा न बदलणाऱ्या ताऱ्यांच्या पुढून जाताना ही वस्तू विल्यम हर्षेल ह्यांच्या दृष्टीस पडली. त्या वस्तूच्या अश्या प्रकारच्या हालचालीमुळे हे तर नक्कीच होते की ह्या वस्तूचे पृथ्वीपासून असलेले अंतर हे ताऱ्यांच्या अंतरापेक्षा नक्कीच कमी आहे.सुरुवातीला विल्यम हर्षेल ह्यांचा असा समज झाला की त्यांना एखाद्या धूमकेतूचे  दर्शन झाले आहे.

परंतु नंतर त्यांना व इतर शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आले की ती अवकाशातील वस्तू म्हणजे एक नवीन ग्रह आहे आणि तो त्याच्या कक्षेतून आपल्याच सूर्याभोवती भ्रमण करीत आहे. प्राचीन काळी लोकांनी ग्रह शोधून काढले त्यानंतर बऱ्याच काळाने अठराव्या शतकात आपल्या सूर्यमालेत असलेल्या एका नव्या ग्रहाचा शोध लागला होता.  नंतर खगोलशास्त्रज्ञांना हे लक्षात आले की त्यांना युरेनसने १६९० साली सुद्धा दर्शन दिले होते. पण त्यावेळी हा एक नवा ग्रह असू शकतो असे त्यांच्या लक्षातच आले नाही. विल्यम हर्षेल ह्यांना पहिल्यांदा युरेनसचे अस्तित्व लक्षात आले. अवकाशात लांबवर अगदी मंद प्रकाश परावर्तित करणारी ही वस्तू म्हणजे युरेनस हा ग्रह आहे हे पहिल्यांदा त्यांच्याच लक्षात आले.

ह्या नव्या ग्रहाचे नाव सम्राट जॉर्ज तिसरे ह्यांच्या नावावरून जॉर्जियम सायडस असावे असा प्रस्ताव विल्यम हर्षेल ह्यांनी मांडला. पण ब्रिटनच्या बाहेरच्या लोकांना हे नाव अजिबातच रुचले नाही. ह्यापेक्षा ग्रहांना नेहमीप्रमाणे प्राचीन देवतांचे नाव देण्याचीच पद्धत पाळावी असा सल्ला योहान एलर्ट बोड ह्या खगोलशास्त्रज्ञाने इतर खगोलशास्त्रज्ञांना दिला. आणि त्यांनी हा सल्ला विचारात घेऊन ह्या ग्रहाचे नामकरण युरेनस असे केले. युरेनस म्हणजे आकाशाचा देव होय. ग्रीक मायथॉलॉजीमधील सर्वात प्राचीन आणि पहिल्या देवांपैकी युरेनस ही अवकाशाची देवता म्हणून ओळखली जाते. ह्याच देवाच्या नावावरून ह्या नव्या ग्रहाला युरेनस हे नाव देण्यात आले. युरेनस ह्या देवाला फादर स्काय असेही म्हटले जाते. फादर स्काय म्हणजेच युरेनस हा जिया म्हणजे मदर अर्थचा पती किंवा पुत्र असल्याचे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सांगितले जाते.

हे नाव सम्राट जॉर्ज तिसरे ह्यांना आवडले. विल्यम हर्षेल ह्यांच्या ह्या शोधामुळे खुश होऊन त्याने हर्षेल ह्यांना नाईट ही पदवी दिली आणि त्यांची त्याच्या शाही दरबारात शाही खगोलशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली.  ह्यामुळे विल्यम हर्षेल ह्यांना नियमित वेतन मिळू लागले व त्यांची आर्थिक अडचण दूर झाली. ते एका ठिकाणी संगीतकार म्हणून काम करीत होते ती नोकरी करण्याची त्यांची गरज संपली आणि ते त्यांचा पूर्ण वेळ अवकाशाचा अभ्यास करण्यात व्यतीत करू शकत होते. त्यांनी त्यानंतर अवकाशाचा अभ्यास व निरीक्षण करताना गॅस जायंट्स म्हणजे वायुस्वरूपात असलेल्या ग्रहांच्या सभोवती असणारे अनेक चंद्र शोधून काढले. तसेच त्यांनी २५०० खगोलीय वस्तूंची सूची तयार केली. ह्या सूचीचा खगोलशास्त्रज्ञ अजूनही उपयोग करतात.

१९७७ साली खगोलशास्त्रज्ञांनी कुइपर एअरबॉर्न ऑबझर्व्हेटरीचा वापर करून आणखी एक महत्वाचा शोध लावला की युरेनस ह्या ग्रहाला शनीप्रमाणेच सभोवताली कडे आहे. आपल्या सूर्यमालेतील युरेनस हा कडे असणारा दुसरा ग्रह आहे. युरेनसच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याची माहिती व्हॉएजर २ ह्या अंतराळयानाने आपल्याला २४ जानेवारी १९८६ रोजी पाठवली. व्हॉएजर २ हे अंतराळयान युरेनसच्या क्लाउडटॉप्सपासून ८१८०० किलोमीटर लांब इतक्या अंतरावर जाऊन पोहोचले आणि त्याने युरेनसची हजारो छायाचित्रे घेऊन पृथ्वीवर प्रसारित केली. तसेच भरपूर प्रमाणात युरेनसची वैज्ञानिक माहिती आपल्याला पाठवली. ह्या मोहिमेमुळे युरेनसचे चंद्र, त्याच्या सभोवताली असलेले कडे, त्या ग्रहावर असलेले वातावरण, तसेच युरेनसच्या अवतीभवती व आत असलेले चुंबकीय वातावरण ह्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळाली.

युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे. हा ग्रह बराचसा वायुस्वरूपात आहे. वस्तूमानांनुसार तो आपल्या सूर्यमालेतील तो चौथा मोठा ग्रह असून व्यासानुसार त्याचा तिसरा क्रमांक आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ४ पटींनी मोठा आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्षे लागतात.  पृथ्वीपासून त्याचे अंतर अंदाजे  २. ६ अब्ज किमी आहे. व्हॉएजर २ हे यान १९७७ साली पृथ्वीवरून प्रक्षेपित करण्यात आले होते ते २४ जानेवारी १९८६ साली युरेनसच्या सर्वात जवळ पोहोचले होते. तेथून ते नेपच्यूनच्या प्रवासासाठी निघून गेले. आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. ह्यापूर्वी ह्या ग्रहाला एक तारा समजले जाई. हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह मानला जातो. त्याचे किमान तापमान -२२४ डिग्री सेल्सियस आहे. युरेनसच्या वरच्या भागातील वातावरणात मिथेन वायूचे दाट धुके आहे. त्यामुळे त्याच्या क्लाउड डेक्समध्ये जी मोठमोठी वादळे येतात ती दिसत नाहीत. युरेनस हा अनेक प्रकारचे वायू आणि बर्फाचा बनलेला आहे. ह्याच्या अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजनची संयुगे आहेत तसेच काही भाग खडकाळ पदार्थांनी व्यापलेला आहे. युरेनसला २७ चंद्र आहेत. त्यातील मिरांडा, एरियल, ओबेरॉन ,टायटॅनिया , अम्ब्रियल हे प्रमुख चंद्र आहेत. ही नावे शेक्सपियर आणि अलेक्झांडर पोप ह्यांच्या कथानकांतील पात्रांच्या नावांवरून घेतली आहेत.

हा ग्रह इतर ग्रहांच्या तुलनेत उलट दिशेने भ्रमण करतो. इतर सर्व ग्रह अँटीक्लॉकवाईज फिरतात पण युरेनस मात्र क्लॉकवाईज फिरताना आपल्याला दिसतो. युरेनसचे सर्वात खास वैशिष्टय म्हणजे तो दर १७ तास ,१४ मिनिटांनी त्याच्या अक्षावर फिरतो. म्हणजे त्याचा एक दिवस हा १७ तास १४  मिनिटांचा असतो. ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे ह्या ग्रहाची ऍक्सिस ऑफ रोटेशन (अक्ष) ही एका बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे. आपली पृथ्वी जी २३.४ डिग्रीला थोडीशी झुकलेली आहे तसा युरेनस हा ग्रह ९८ डिग्रीच्या ऍंगलला झुकलेला आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास इतर ग्रह उभे आहेत तेव्हा युरेनस हा आडवा झोपलेला आहे. इतर सर्व ग्रह हे उभ्याने किंवा किंचितसे झुकून स्वतःभोवती फिरत असताना सूर्याला प्रदक्षिणा घालत असतात तेव्हा युरेनस हा एखाद्या चेंडूप्रमाणे आडवा फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतो. म्हणूनच जिथे इतर ग्रहांचे विषुववृत्त असते तिथे युरेनसचे उत्तर व दक्षिण ध्रुव असतात. म्हणूनच युरेनसचे वर्णन करताना "“rolling around the Sun on its side” असे म्हटले जाते. म्हणजे ह्याच्या सर्वच गोष्टी इतर ग्रहांपेक्षा उलट आहेत. 

तर असा हा युरेनस ज्याला आपण हर्षल किंवा हिंदीत अरुण म्हणून ओळखतो हा एक अद्वितीय ग्रह आहे.


Different Genres of Hindi movies


There are many categories or genres in Hindi movies. People love to watch Hindi movies which contain drama, comedy , suspense, action, thrill, romance, mythology etc. There are the  films which has unique subjects and there are the films which have all in one formula. People love these all in one kind of films more. But there is one other category named as ‘experimental’ films. The experimental Hindi films break the usual ‘masala’ routine of sing and dance around the bushes of Bollywood movies. They try something new and unusual. But very few falls in such category. For example , Sanjay Leela Bhansali’s movie ‘Black’. Second one is Raghu Romeo. The short films also have some good and unique storylines.

A lot of Hindi films fall in either romance or drama or masala category. They have similar plots. Very few movies have an original storyline. Rather many are the inspirations taken from here and there and others are remakes of Hollywood or south films. Slapstick comedy is another genre of Hindi films. Many films have double meaning dialogues. These non veg and double meaning comedy really make the sophisticated and elite viewers cringe. Very few comedy movies are neat and can be watched by the whole family and kids. There were many attempts to create a good suspense thriller movie earlier. But very few got succeeded in getting the audiences those goosebumps.

In my point of view ,out of the movie releases in the recent years,  some good movies are Dil Chahta Hai, Swades, Delhi 6, Zindagi Na Milegi Dobara, Band Baja Baraat, Rab Ne Bana DI Jodi, Chak De India, Kabhi Alvida Na Kehna , Rang De Basanti and Parineeta. These are all in one masala kind of movies. Rather some movies had a very good social message in them along with the entertainment.

Good movies based on the genre of crime and thriller are Company, Shool, Omkaara, Johhny Gaddar, Kaminey, D, Once Upon A Time In Mumbaai, Gangs Of Wasseypur, Mithya and Sehar. The level of violence was high in these films and people got goosebumps after watching these crime dramas.  On the other hand many good suspense movies came up in the recent years. These are original stories and people loved them. Some of these fine suspense thrillers are Talaash, Kahaani, Ek Hasina Thi, Manorama Six Feet Under, Ek Chalis Ki Last Local, Taxi No. 9211, Road, A Wednesday etc. These films had a very strong script and it really brought a lump in the throats.

These days when filmmakers believe in double meaning dialogues and non veg jokes, some directors had done a great job in the comedy genre. They have delivered some absolutely funny movies which caused a laughter riot. Hera Pheri, Jaane Bhi Do Yaaron, Khosla Ka Ghosla, Chashme Baddoor, Malamaal Weekly, Bheja Fry, Vicky Donor  did a good job in making people laugh with a clean comedy. While Romeos and Juliets loved to connect with the superb love stories like Saathiya, Cheeni Kum, Socha Na Tha, Love Aaj Kal, Aisha, Rockstar, Jaane Tu Ya Jaane Na, Pyar Ke Side Effects, Jab We Met etc. The whole family watched and enjoyed clean flicks Like Iqbaal, Do Dooni Chaar, 3 Idiots, Taare Zameen Par, Baghban, Aaja Nach Le , The Blue Umbrella etc.  Besides these genres, some movies have the subjects related to current affairs. Some movies are based on real life stories and some are women centric stories. These are known as the experimental or alternative subject movies.

Generally common man wants to forget all his worries and tensions while watching the movie. So filmmakers try hard to entertain their audiences by making a light hearted and enjoyable movie which people can connect to.  


Social media addiction and us

 

सोशल मिडीयाचा उदय होऊन आता बराच काळ लोटला आहे. लहान , थोर सगळेच whatsapp , facebook , instagram, snapchat, twitter, tumblr आणि बऱ्याच सोशल मिडिया चॅनेल्स वर मुक्तहस्ते डेटा कुर्बान करीत असतात. हल्ली सोशल मिडिया वर active नसणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते.

तू फेसबुक वर नाहीस?’’ हा प्रश्न एखाद्या गुन्हेगाराला पोलीस बोल तूच चोरी केलीस का?’’ जसा विचारतील तशाच थाटात लोक फेसबुक, whatsapp  न वापरणाऱ्याला विचारतात.  सोशल मिडिया वर active  असणे ह्यात काहीही वाईट अजिबात नाही. जोवर हे सगळं टाईमपास साठी लाईटली घेतलं जातंय तोवर ठीक. पण जेव्हा लोक सोशल मिडिया वरच्या आपल्या प्रोफाईल ची तुलना खऱ्याआयुष्यातल्या प्रतिमेशी करायला लागतात तेव्हा खरा प्रॉब्लेम सुरु होतो आणि जगातील सर्व तरुणाई सध्या ह्याच कोशात अडकली आहे आणि जगभरातल्या मानसोपचार तज्ज्ञांनी ह्यावर चिंता व्यक्त केली आहे. कारण सोशल मिडिया ऍडिक्शन आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस आणि डिप्रेशन हा मानसिक आजार टीनेजर्स आणि त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तरुणांमध्ये बळावतो आहे. रात्रीच सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या टीनेजर्स आणि तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ह्याचा दुष्परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आहे असे मत जगातील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

मागे झालेल्या  वर्ल्ड स्लीप डे च्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सने (NIMHANS) त्यांचे संशोधन प्रकाशित केले. त्यांच्या संशोधानानुसार, सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे  टीनेजर्स व तरुण निशाचर होत आहेत. त्यांची झोपण्याची वेळ हि दीड तासाने पुढे सरकली आहे. ह्याचा अतिशय मोठा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून भविष्यात ह्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. कमी किंवा अपुरी झोप मिळाल्यामुळे हृदयरोग, ब्लड प्रेशर चा धोका संभवतो तसेच निद्रानाश सुद्धा होऊ शकतो. हल्ली अनेक तरुण इनसोम्निया म्हणजेच निद्रानाशाने ग्रस्त आहेत आणि रात्रीची झोप नसली कि अनेक निगेटिव्ह विचार डोक्यात येऊन डिप्रेशन सुद्धा येण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्या शिवाय रात्री झोप लागली तर मध्ये मध्ये जाग आल्यावर फेसबुक , व्हॉट्सअॅप चेक करणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे.

हल्ली  जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात. सतत आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स कशा मिळतील ह्याच विचारात ग्रस्त असणाऱ्या ह्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते.

आपल्या पोस्टला, सेल्फी ला कोणीच लाईक करत नाही ह्याचे डिप्रेशन सुद्धा त्यांना येते. एकूणच व्हर्च्युअल जगाकडे हि मुले खूप सिरीयसली बघत असतात. जरा वेळ इंटरनेट किंवा वायफाय बंद पडले कि ती अस्वस्थ होतात, सतत मेसेज साठी किंवा नोटीफिकेशन साठी फोन चेक करणे हि सवय लागते आणि थोड्या वेळासाठी सुद्धा मोबाईल वर काही अपडेट आले नाही तर अस्वस्थ व्हायला होते. हि सगळी लक्षणे ऍडिक्शन ची आहेत आणि ह्याचे मानसिक आजारात रूपांतर होऊ शकते. लहान वयात पॅनिक आणि एन्झायटी चे अटॅक येऊ शकतात. एखाद्या सोशल मिडिया फ्रेंड ने काही मेसेज किंवा पोस्ट टाकली तर त्याला लगेच रिस्पॉन्स देणे हि त्यांना त्यांची जबाबदारी वाटते आणि तशीच अपेक्षा त्यांचीही त्यांच्या सोशल मिडिया सर्कल कडून असते. जर त्यांना अपेक्षित  रिस्पॉन्स मिळाला नाही तर त्यांना आपण दुर्लक्षित आहोत असे वाटून डिप्रेशन येऊ शकते. ह्या सोशल मिडिया वर आपली इमेज टिकवणे हे टीनेजर्स चॅलेंज समजतात. सोशल मिडीयाचे हि मुलं इतक प्रेशर घेतात कि सतत अपडेटेड राहण्यासाठी सतत फोन चेक करतात. चुकूनही आपल्याकडून काहीही मिस होऊ नये ह्याचं इतकं प्रेशर त्यांना असतं कि ते रात्री सुद्धा शांत झोपत नाहीत. सतत रात्री बेरात्री उठून फोन चेक करतात. ह्या व्हर्च्युअल जगापासून थोडाही वेळ लांब राहणे त्यांना जमत नाही.

हे प्रेशर टीनेज मुलांपेक्षा टीनएज मुली जास्त घेतात. जेव्हाही टीनएज मुली टेन्शन मध्ये असतात किंवा चिंतेमध्ये असतात , त्या स्वतःचा मूड चांगला करण्यासाठी आपसूकच सोशल मीडियाकडे वळतात. पण हा सोशल मिडिया त्यांना आणखी प्रेशर देतो. प्रेशर परफेक्ट दिसण्याचं, परफेक्ट वागण्याचं, परफेक्ट फिगर असण्याचं ,  प्रेशर परफेक्ट फ्रेंड सर्कल असण्याचं, प्रेशर सगळीकडे भरपूर लाईक्स मिळवण्याचजर ह्यातलं काही मिळवण त्यांना जमल नाही तर स्वतःलाच कमी समजून त्रास करून घेण्याकडे ह्यांची वाटचाल सुरु होते, स्वतःच बद्दल घृणा, तिटकारा वाटतो आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय गंभीर आहे .

ह्या सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे शारीरिक त्रास सुद्धा होतात. अपुरी झोप झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, एकाग्रतेवर कमी होऊन अभ्यासावर विपरीत परिणाम होतो , रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन अनेक आजार बळावतात. करियर च्या महत्वाच्या वर्षात असे शारीरिक नुकसान झाल्याने त्याचे हि नुकसान होऊ शकते. सगळीकडे ह्याची चर्चा होते पण ह्यावर कंट्रोल कसा करायचा हे मात्र समजत नाही.

आपण जर हे सगळे त्रास अनुभवत असू तर भविष्यातल्या धोक्याची हि नांदी आहे हे समजून वेळीच सोशल मिडियाचा अतिवापर बंद करून आपापले ऍडिक्शन कमी करायचा नक्कीच पर्यंत करायला हवा. नाहीतर अब पछताये क्या होगा जब चिडिया चुग गयी खेत! असे म्हणायची वेळ येईल.

 


येस! आय ऍम अ सी- सेक्शन मॉम!


बाळ होणं ही संपूर्ण कुटुंबासाठीच एक आनंदाची गोष्ट असते. पण जिला बाळ होतं तिच्यासाठी आई होणं ही कितीही आनंदाची गोष्ट असली तरीही तो संपूर्ण अनुभव एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नसतो. तो मॉर्निंग सिकनेस, पाठदुखी, कंबरदुखी आणि तो बाळंतपणाचा अत्यंत कठीण अनुभव! उगाच म्हणत नाहीत की, "बाळन्तपण म्हणजे आईचा दुसरा जन्मच असतो"! म्हणूनच सगळं सुरळीत होईपर्यंत कुटुंबातील सर्वांनाच टेंशन असतं! बाळंतपण एकदा सुरळीत पार पडलं की सगळीकडे बाळ जन्मल्याची गोड बातमी मिठाईबरोबर सांगितली जाते. बरेच लोक मुलगी आहे की मुलगा हे कळल्यानंतर आईची तब्येत कशी आहे हा प्रश्न न विचारता वेगळाच प्रश्न विचारतात ,"काय मग? नॉर्मल झालं की सिझेरियन?" त्यात जर सुदैवाने नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर सगळे अभिनंदन करतात पण चुकून जर सिझेरियन झाले असले तर मग लोक चक्क डॉक्टरांच्या ज्ञानावरच शंका घेतात आणि सिझेरियन करणे कसे चूक आहे, आजकाल हा कसा बिझनेस झाला आहे , डॉक्टर कसे रिस्क घ्यायला तयार नसतात, पैसे उकळण्यासाठी सिझेरियन करतात वगैरे वगैरे वर चर्चा होते.

पण लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की सिझेरियन कि नॉर्मल डिलिव्हरी व्हावी ह्याचा निर्णय घेणे आईच्या हातात नसून डॉक्टरांच्या हातात असते. जर डॉक्टर म्हणाले की इमर्जन्सी आहे व सिझेरियन करावे लागेल तर आधीच वेदना सहन करत असलेली, टेन्शन आलेली आई त्या अवस्थेत डॉक्टरांशी वाद घालू शकेलच असे नाही. पण लक्षात कोण घेतो? सिझेरियनने डिलिव्हरी झाली म्हटल्यावर लोक डॉक्टरांबरोबरच आईलाही दोष देतात. असंच रागिणीबाबतीत सुद्धा झालं! ऐनवेळी काही कॉम्प्लिकेशन्स आल्यामुळे रागिणीचे सी-सेक्शन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. डिलिव्हरी सुखरूप झाली. बाळ आणि रागिणी दोघांचीही तब्येत व्यवस्थित होती आणि पाच ते सहा दिवसांनी रागिणी व बाळ घरी आले. नेहमीप्रमाणे घरी भेटायला येणारी मंडळी सी सेक्शन झाले म्हटल्यावर अरेरे म्हणत तिला नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे सांगत होती. त्यातील माहेरच्या मंडळींना तिने "आता डिलिव्हरी झाली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चेचा काही फायदा आहे का?" असे गोड शब्दात सुनावून तो विषय तिथेच थांबवला. पण सासरच्या मंडळींशी बोलताना जपून बोलावे लागत असल्याने ती त्यांच्याशी फार वाद घालण्याच्या भानगडीतच पडत नव्हती. पण तेच तेच नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे आणि सी सेक्शनचे तोटेपुराण ऐकून तिचे कान किटले. एकदा अश्याच एक नातेवाईक काकू भेटायला आल्या आणि "हल्ली काय बाई मुलींना कळा सहन करायला नकोत, आम्ही कश्या दोन दोन दिवस कळा सहन केल्या आणि मग बाळाचा जन्म झाला. हल्ली डॉक्टर सुद्धा पैसेकाढू झालेत. नॉर्मल डिलिव्हरीची वाटच बघत नाहीत, सिझेरियनने प्रसूती म्हणजे आयतेच काम होते. बरंय बाई तुला कळा सहन कराव्या लागल्या नाहीत, आयतेच बाळ हातात मिळाले" वगैरे वगैरे बोलत होत्या. हे सगळे ऐकून  रागिणीच्या डोक्याचा प्रेशर कुकर झाला. कधीही स्फोट होईल असे तिला वाटत होते पण तिने कण्ट्रोल केले. तिने शांतपणे काकूंचा गैरसमज दूर करायचे ठरवले.

ती म्हणाली, "काकू! तुम्ही माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला यायला हवं होतं हो! तेव्हा बाळाचे हार्टबीट्स कमी झाले म्हणून बाकी सगळे घाबरले होते आणि डॉक्टरांचं ऐकून सिझेरियन केलं!तेव्हा तुम्ही आला असता तर डॉक्टरांना चांगलं ठणकावून सांगितलं असतं तर बरं झालं असतं.म्हणजे माझी डिलिव्हरी नक्की नॉर्मल झाली असती."

"बाई गं ! डॉक्टरांशी कुणी वाद घालायचा? आणि काही कमी जास्त झालं म्हणजे? सगळे मलाच बोलायला मोकळे!" काकू लगेच सावरून घेत बोलल्या.

"Exactly.. डॉक्टरांना आपल्यापेक्षा जास्त कळतं म्हणूनच त्यांचा निर्णय आपण ऐकायचा असतो. त्यांनी म्हटलं सिझेरियन करावं लागेल तर माझ्या आणि बाळाचा जीव सुखरूप राहावा म्हणून केलं सी सेक्शन! मला काय वाटतं डिलिव्हरी कशी झाली ह्यापेक्षा ती सुखरूप झाली आणि बाळ व मी बरे आहोत हे जास्त महत्वाचं नाही का? उद्या आपलीच मनमानी केल्याने काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे? लोक तर डॉक्टरांचीच कॉलर धरून त्यांना मारहाण करायलाही कमी करत नाहीत.आणि एवढं करून झालेलं नुकसान भरून निघतं का?", रागिणी म्हणाली. काकूंना किती आणि काय पटलं देव जाणे आणि त्या रागिणीचा निरोप घेऊन निघाल्या. रागिणीच्या मनात मात्र विचारचक्र सुरु झाले. बायकाच बायकांना समजून घेत नाही ही किती चुकीची गोष्ट आहे? सी सेक्शनद्वारे डिलिव्हरी होणे हा अपराध आहे की काय असे लोक बोलत असतात.

सिझेरियन झाले की लोक आईला का दोष देतात? आणि दोष देणाऱ्या ह्या बायकाच असतात ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. एका मैत्रिणीची जेव्हा सी सेक्शन द्वारे डिलिव्हरी झाली तेव्हा दुसऱ्या मैत्रिणीने तिला "बरंय बाई तुझं! आयतीच डिलिव्हरी झाली. बाळंतपणाच्या कळा सोसाव्या लागल्या नाहीत तुला.. लकी आहेस तू!" असे म्हणत आपले ज्ञान पाजळले. पण त्या हुशार मैत्रिणीला ही कल्पना नव्हती की सी सेक्शनमध्ये पोट फाडून "आयतेच" बाळाला बाहेर काढले असले तरी नंतर टाके असतात आणि ते प्रचंड दुखतात. भूल द्यायला "एपिड्युरल" दिले जाते त्यामुळे बऱ्याच बायकांना आयुष्यभर कंबरदुखी/पाठदुखी मागे लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा काही गुंतागुंत निर्माण होते तेव्हा आई व बाळाचा जीव सुरक्षित राहण्यासाठी सी सेक्शनचा हा निर्णय घेण्यावाचून ना डॉक्टरांकडे पर्याय असतो ना त्या आईच्या कुटुंबीयांकडे!  बोलणारे लोक हा विचार का करत नाहीत?

दुसरी गोष्ट म्हणजे काही महान बायका जर बाळाला आईचे दूध पुरत नसेल आणि चुकून जर का तिची सी सेक्शनद्वारे डिलिव्हरी झाली असेल तर ,"नाहीतरी हिने कुठे कळा सोसून बाळाला जन्माला घातलंय!मग कसा पान्हा येणार हो हिला?" असा जावईशोध लावून मोकळ्या होतात. कळा सोसल्या नाहीत म्हणून तिचे तिच्या बाळावरचे प्रेम कमी असते किंवा ती टेक्निकली खरी आईच नाही असा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा सत्कारच केला पाहिजे. जिथे दुसऱ्याच्या बाळाविषयी सुद्धा बायकांच्या मनात ममत्वाची भावना असते तिथे नऊ महिने ज्या बाळाला पोटात वाढवलं त्या बाळाविषयी प्रेम केवळ कळा सोसल्या नाहीत म्हणून कमी होतं ह्या लॉजिकला खरंच साष्टांग नमस्कार.. जरी तिने कळा सोसल्या नसतील, तरी बाळाला तर तिनेच नऊ महिने पोटात वाढवलेले असते ना? आणि काही बायकांच्या बाबतीत तर कळा सुद्धा येतात पण ऐनवेळी काहीतरी गुंतागुंत झाल्यामुळे सी -सेक्शन करावे लागते.

अनेक बायकांना वाटतं सी -सेक्शन म्हणजे शॉर्टकट आहे. पण तसे नसते. सी -सेक्शन सोपे नाही. त्याचे आईच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. आणि ते दूरगामी परिणाम असतात. पण त्याला काही इलाज नाही कारण त्यावेळी आईची सुखरूप सुटका होणे आणि बाळाचा सुखरूप जन्म होणे हे सर्वात जास्त महत्वाचे असते. आणि एकदा डिलिव्हरी झाल्यावर "काय करायला हवं होतं" हे बोलून काही उपयोग नसतो. त्यामुळे सारखं सारखं सी -सेक्शन किती वाईट आहे हे सांगून त्या आईला मानसिक त्रास देऊ नये. तिला आधीच शारीरिक त्रास झालेला असतो. हे सी-सेक्शन शेमिंग कुठेतरी थांबायला हवं. 

कारण नसताना कुठली शहाणी बाई एखादं मेजर ऑपरेशन करायला तयार होईल? नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा सी सेक्शनमधून रिकव्हर व्हायला जास्त वेळ लागतो. त्यात इन्फेक्शनची भीती असते. ब्लीडींग जास्त होतं, ऍनेस्थेशिया मुळे काही रीऍक्शन होऊ शकते. ओटीपोटावर ज्या जागी जखम असते तिथे टाक्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची भीती असते. टाके प्रचंड दुखतात. आणि ती जागेवरची संवेदना कायमस्वरूपासाठी कमी होते. सी सेक्शनमध्ये आपल्या शरीराच्या आतील अवयव म्हणजे आतडी किंवा मूत्राशयाला जखम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

म्हणजेच सी-सेक्शन डिलिव्हरी सुद्धा लोकांना वाटते तितकी सोपी नाही. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला बायकांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि सी सेक्शनच्या वेळी जरी भूल दिलेली असली तरी त्याचा त्रास नंतर सहन करावा लागतो. म्हणजेच कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी अजिबात सोपी वगैरे नसते. तो खरोखर बायकांचा दुसरा जन्म असतो कारण दोन्ही प्रकारांत बायकांच्या शरीराची प्रचंड झीज होते आणि त्यांना त्रास होतो. शेवटी सर्वात महत्वाचे काय, तर आईची सुटका सुखरूप होणे व बाळ सुखरूप जन्माला येणे!

आई ती आईच असते मग बाळाच्या जन्माची पद्धत कुठलीही असो. त्यामुळे केवळ तुमची सी-सेक्शन डिलिव्हरी झाली म्हणून तुम्हाला कुणी आळशी म्हणत असेल, किंवा तुमच्या बाबतीत सगळं सोपं आहे वगैरे म्हणत असेल किंवा तुमच्या आईपणावरच शंका घेत असेल तर त्या व्यक्तीशी वाद घालण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि गिल्टी तर अजिबातच वाटून घेऊ नका. उलट असा विचार करा की "Yes! I am a c-section mom and I am proud of it. माझ्या व माझ्या बाळाच्या तब्येतीसाठी मी हे केलं आणि मी व माझं बाळ सुखरूप असल्याचा मला आनंद आहे. "

 

एप्रिल महिना हा सी-सेक्शन अवेअरनेस मन्थ आहे, त्यानिमित्त सी-सेक्शनद्वारे प्रसूती झालेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना व सगळ्या मातांना हा लेख समर्पित! 

 



अपूर्ण नव्हे परिपूर्ण मी!


टीव्हीवर बातम्यांमध्ये आणि पेपरमध्ये बातमी आल्यापासून नारायणी आणि वीरेंद्रचे फोन अभिनंदनासाठी सतत खणखणत होते. लंडनला झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा जय आज सगळ्यांच्या कौतुकाचा आणि अभिनंदनाचा विषय ठरला होता. त्याने परदेशात आपल्या देशाला गौरव मिळवून दिल्यामुळे वर्तमानपत्र, टीव्हीवरच्या बातम्या आणि सोशल मीडिया ह्या सगळीकडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. नारायणी आणि वीरेंद्रचे अभिनंदन करताना लोक थकत नव्हते. इतके दिवस जयकडे विचित्रपणे बघणारे आणि त्याला होपलेस , मतिमंद ठरवून मोकळे झालेले नातेवाईक आणि मित्रमंडळी, सोशल मीडियावर जयशी कुठले ना कुठले नाते जोडू पाहत होते.  हे सगळे बघून नारायणीला एकीकडे जयला जन्म दिल्याबद्दल कृतकृत्य वाटत होते. पण सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या आणि वाहत्या गंगेत हात धुवू पाहणाऱ्या लोकांचा उबग येत होता. तिला तो दिवस आठवला जेव्हा जयचा जन्म झाला होता.

आई व बाबांचे सगळे छान छान फीचर्स घेतलेला जय जन्माला आला तेव्हाही लोकांनी असेच नारायणी ,वीरेंद्र व सर्व कुटुंबाचे अभिनंदन केले. गोड ,गोंडस रुपडं असलेले आपले बाळ बघून नारायणीला त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. त्याच्यासाठी ती रोज एक नवे स्वप्न बघायची. वीरेंद्र आणि नारायणीने जयसाठी केवढे प्लॅनिंग केले होते! त्याला हे शिकवायचे, त्याला हा क्लास लावायचा!  त्याच्या भविष्यासाठी त्यांनी तो झाल्यापासूनच तरतूद करणे सुरु केले होते. त्याच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये, तो खूप मोठा व्हावा म्हणून त्यांनी सर्व प्रयत्न करायचे ठरवले होते. वीरेंद्र तर जय कधी मोठा होऊन "बाबा! बाबा!"करत त्याच्याशी क्रिकेट, फुटबॉल खेळण्याचा हट्ट करेलबाहेर फिरायला नेण्याचा हट्ट करेल. रोज नवी खेळणी ,खाऊ घेऊन मागेल ह्याचीच वाट बघत होता. नारायणी तर जय कधी मोठा होऊन बोलायला लागेल ह्यासाठी आतुर झाली होती. जयचे बोबडे बोल ऐकण्यासाठी ती आतुर होती. जय एक वर्षाचा झाला. पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. आई बाबा त्याच्याशी खूप गप्पा मारायचा प्रयत्न करीत असत, त्याला विविध रंगेबेरंगी ,विविध आवाज करणारी खेळणी आणून दिली होती. पण तो फक्त गोल गोल फिरणाऱ्या भिंगरीकडे, पंख्याकडे, सायकलंच्या चाकाकडे बघतच रमत असे. त्याला इतर खेळण्यांमध्ये काही रसच नव्हता. कोणीही त्याच्याशी बोलले की तो लक्षच देत नसे.  बाहेर गर्दीत नेले तर अस्वस्थ होऊन रडून गोंधळ घालत असे.

नारायणीच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा त्याला सॉफ्ट टॉय आणून दिले आणि गंमत म्हणून त्याच्या हातात दिले तर त्याने घाबरून ,रडून घर डोक्यावर घेतले होते. अनोळखी लोकांकडे तर तो बघायलाही तयार होत नसे. जय दीड वर्षांचा झाला तरी अजिबातच बोलत नव्हता म्हणून नारायणीने त्याची कानांची व श्रवणाची तपासणी करून घेतली. पण त्याला सगळे व्यवस्थित ऐकायला येत होते. पण मग नारायणी इतके प्रयत्न करूनही जय मात्र अजूनही बोलू शकत नव्हता. तसेच तो प्रचंड मूडी होता. त्यामुळे नारायणी व वीरेंद्र दोघेही खूप चिंतेत होते. अखेर दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले. जयच्या बालरोगतज्ज्ञांनी जयची लक्षणे बघून त्यांना न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्यास सांगितले. न्यूरॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे म्हटल्यावरच नारायणी आणि वीरेंद्र दोघांच्याही पोटात गोळा आला. पण कशीतरी हिम्मत ठेवून आणि जयच्या समस्येवर काहीतरी उपाय सापडेल म्हणून दोघे शहरातील ख्यातनाम चाईल्ड न्यूरॉलॉजिस्टकडे जयला घेऊन गेले. तेथे जयची तपासणी करून ,त्याची एकूण लक्षणे बघता जय हा स्वमग्न म्हणजेच ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहे हे कळल्यावर तर वीरेंद्र आणि नारायणीच्या पायाखालची जमीनच सरकली.

नारायणी तर हे मानायलाच तयार नव्हती, की तिचा गोंडस राजकुमार ऑटिस्टिक आहे. गरोदरपणात इतकी काळजी घेऊन, गर्भसंस्कार वगैरे सगळं करून सुद्धा जयच्या बाबतीत असे कसे झाले ह्याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. 

ती हताश झाली. निराश झाली. चारचौघात गेले तर लोक आपल्या मुलाकडे विचित्र नजरेने बघतात, पाठीमागे काहीही बोलतात ह्यामुळे तिला आणखी दुःख वाटू लागले. अनेक नातेवाईकांनी तिला व वीरेंद्रला जय तर आता असाच राहणार, तुम्ही दुसरा चान्स घ्या. असाही सल्ला दिला. लोक त्याला मतिमंद समजून वाट्टेल ते सल्ले देऊ लागले. त्यामुळे जयला चारचौघात घेऊन जाणेच तिला नको वाटू लागले. समारंभ वगैरे असतील तर तिने व वीरेंद्रने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. कारण लोक तर "त्याच्यावर कुणीतरी करणी केली, बाहेरची बाधा आहे इथपासून तर बाबा बुवा, अंगारे -गंडे दोरे" इथपर्यंत अनाहूत सल्ले देऊ लागले. काही आगाऊ बायका तर "कुठल्या तरी जन्माची पापं भोगताहेत" असेही म्हणून मोकळ्या झाल्या. हे सगळे बघून ऐकून नारायणीला प्रचंड दुःख होत असे. सुरुवातीला तिला कुणी सल्ला द्यायला आले तर ती ,"ऑटिझम किंवा स्वमग्नता हा आजार नसून ती एक मानसिक अवस्था आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे,हा कुठलाही मानसिक आजार नव्हे.ऑस्टीटिक व्यक्ती आपल्याच विश्वात रममाण असतात. त्यांना संवेदनांचे अर्थ लावण्यात अडचण येते त्यामुळे त्या व्यक्तींना प्रतिक्रिया देताना त्रास होतो किंवा अडचणी येतात. स्वमग्न व्यक्तींना भाषा संप्रेषण आणि वैचारिक देवाणघेवाणीची समस्या असते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद देताना गोंधळ उडतो. म्हणूनच ही मुले भोवतालच्या जगाशी काहीही संपर्क नसल्यासारखे वागतात. आपले बोलणे त्यांच्या कानांवर पडून देखील ते नजरेला नजर देऊ शकत नाहीत. शाब्दिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर मतिमंदत्वाचा शिक्का बसतो. पण अनेक ऑटिस्टिक मुले हे मतिमंद नसतात" असे सांगून त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत असे. पण बहुतांश लोकांना शंकानिरसन नको असते,फक्त चर्चेला विषय हवा असतो हे तिच्या लक्षात आल्यावर तिने असल्या लोकांशी वाद घालणेच बंद करून टाकले.

आता जय तीन वर्षांचा झाला होता तरीही त्याचा भाषेचा विकास झाला नव्हता. आपल्याच दुनियेत मग्न असलेल्या आपल्या निरागस निष्पाप बाळाकडे बघून नारायणी आणि वीरेंद्रचा जीव कासावीस होत असे. नारायणी तिला जमेल तसे जयला शिकवण्याचा प्रयत्न करीत असे. नेटवरून माहिती शोधून ती तिला जमेल तसे प्रयत्न करत असे. अशीच शोधाशोध करताना तिला स्वमग्न मुलांसाठी असलेल्या स्पेशल सेंटरविषयी माहिती मिळाली. दुसऱ्याच दिवशी वीरेंद्र व ती जयला घेऊन तिकडे गेले.  तिथे त्यांना समजावून सांगण्यात आले की स्वमग्न मुलांना नुसतेच स्पेशल शाळेत घालून उपयोग होत नाही तर प्रत्येक मुलाच्या  क्षमतेप्रमाणे संयुक्त उपचारपद्धती व शिक्षणपद्धतींचा अवलंब करून त्यावर काम करावे लागते. स्पेशल शिक्षण,ऑक्युपेशनल थेरपी, फिझियोथेरपी, स्पीच थेरपी, डान्स थेरपीड्रामा थेरपी, म्युझिक थेरपी अश्या विविध पद्धतींचा अवलंब करून मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिकवले जाते. त्यांना व्होकेशनल शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो.

त्या सेंटरला गेल्यावर नारायणी व वीरेंद्रच्या मनात आशा निर्माण झाली आणि आपल्या बाळाचे भविष्य घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. आता प्रश्न होता जयला नेमका कशात रस वाटतो हे शोधून काढणे! पण हे सोपे नव्हते. नारायणीने त्या सेंटरमधील इतर पालकांशी मैत्री केली. आपल्यासारखेच समदुःखी आईवडील किती पेशन्स ठेवून ,आपल्या बाळाला समजून घेऊन आपापल्या बाळाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू पाहत आहेत हे बघून तिनेही हार न मानता जयसाठी लढण्याचे ठरवले.

दिवस भराभरा जात होते आणि जय पाच वर्षांचा झाला. पण त्याला नेमका कशात रस आहे ,त्याला काय आवडते हे कुणालाही कळत नव्हते. अशातच रोजच्या रुटीनला कंटाळून थोडा ब्रेक म्हणून वीरेंद्रने चार दिवस कुठेतरी फिरायला जायचे ठरवले. निवांत,लांब एखाद्या रिसॉर्टला जाऊन आराम करायचे ठरवले, जिथे फार गर्दी नसेल आणि आणि जिथे लोकांच्या नजरा असणार नाहीत. म्हणून तो नारायणी व जयला घेऊन कोकणातल्या एका लहानश्या गावातल्या रिसॉर्टला गेला. तिथे गेल्यावर थोडं सेटल झाल्यावर वीरेंद्र रिलॅक्स व्हायला म्हणून स्विमिंग पूल मध्ये उतरला. नारायणी जयला घेऊन स्विमिंग पूलच्या काठावर बसलेली होती. जय एकटक स्विमिंग पूल कडे आणि त्यात पोहणाऱ्या त्याच्या बाबांकडे बघत होता आणि अचानक नारायणीच्या मांडीवरून उतरून तो स्विमिंग पूल कडे पळाला. वीरेंद्रने पटकन त्याला झेलले आणि उथळ पाण्यात ठेवले. तो एखाद्या सराईतासारखे पाण्यात हात पाय मारू लागला. वीरेंद्रने त्याला दोन्ही हातांवर धरून ठेवले आणि तो आत पाय मारून पोहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पाण्यात खेळणे खूप आवडले. दोन तास झाले तरी तो पाण्यातून  बाहेर यायला तयारच नव्हता.अखेर कसेबसे वीरेंद्रने त्याला बाहेर आणले.  त्या रिसॉर्टला चार दिवस सकाळ संध्याकाळ जयचा मुक्काम स्विमिंग पूल मध्येच होता. आणि अशा रीतीने नारायणी व वीरेंद्रला जयची आवड  कळली. पण जयसारख्या स्पेशल मुलाला स्विमिंग शिकवायला कोण तयार होणार? त्यात सार्वजनिक स्विमिंग पूल वर गर्दी असणार, तिथे जयला नेले तर तो परत अस्वस्थ होणार ह्या सगळ्या अडचणी नारायणी आणि वीरेंद्रच्या पुढ्यात उभ्या होत्या. ह्यावर मार्ग म्हणून वीरेंद्रनेच सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये सकाळी जयला स्विमिंग शिकवण्याचा निर्णय घेतला. सकाळी पूलवर फारशी गर्दी नसल्यामुळे  जयला सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. उलट स्विमिंग त्याच्या अत्यंत आवडीची गोष्ट झाली होती. तो लवकरच चांगल्याप्रकारे पोहू लागला. एक दिवस सकाळी जय आणि वीरेंद्र स्विमिंगचा सर्व करत असताना तिथे प्रकाश सर आले. प्रकाश सर हे स्विमिंग कोच होते आणि योगायोगाने  वीरेंद्रच्याच सोसायटीत राहत होते. त्यांनी जयचे स्विमिंग बघितले आणि त्यांनी वीरेंद्रकडे    जयला स्विमिंग शिकवण्याची परवानगी मागितली. त्यांच्या मते जय हा बॉर्न स्वीमर आहे आणि योग्य कोचिंग मिळाल्यास स्विमिंगमध्ये त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.

प्रकाश सर म्हणाले की ,"आपले मूल स्वमग्न आहे हे पालकांना स्वीकारणे कठीण जाते. पण ते स्वीकारून त्या मुलांचे आयुष्य शक्य तितके सुकर करण्यासाठी प्रयत्न हे पालकांनाच करावे लागतात. ह्या मुलांचे आयुष्य सुकर करण्यासाठी प्रचंड पेशन्स ठेवून त्यांना प्रेमाने समजून घेण्याची आवश्यकता असते. आपले मूल ऑटिस्टिक आहे म्हणजे सगळे संपले असे मानू नये.  कित्येक ऑटिस्टिक मुले उत्तम कलाकार असतात. त्यांच्या भावना ते विविध कलेतून व्यक्त करतात. मोठ-मोठी आकडेमोड काही सेकंदात करतात.काहींची स्मरणशक्ती अगदी चमत्कारिक असते. कित्येक जागतिक दर्जाचे यशस्वी खेळाडू सुद्धा ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहेत. कधी कधी ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये असलेल्या मुलांना ADHD  म्हणजेच अटेन्शन डिफिसिट / हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असू शकतात. ह्या दोन्हींची लक्षणे एकमेकांच्या जवळ जाणारी आहेत. बरेचसे खेळाडू हे ADHD वर मात करून आज यशस्वी झालेले आहेत.  ऑस्ट्रेलियन जलतरणपटू मायकल फेल्प्स, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन, अमेरिकन खेळाडू ब्रूस जेनर, मॅजिक जॉन्सन,जॅकी स्टीवर्ट, टेरी ब्रॅडशॉ ब्रूस जेनर, जेसन कीड, चार्ली हसल (पीट रोझ) ,द रायन एक्सप्रेस म्हणजेच नॉलन रायन,स्कॉट एयर अश्या अनेक खेळाडूंमध्ये ADHD चे निदान झाले आहे.तरीही त्यांनी प्रचंड संघर्ष करीत आपल्या मानसिक अवस्थेवर मात करीत आपापल्या खेळात प्राविण्य मिळवून यश संपादन करत अनेकांना प्रेरणा दिली. ऑस्टीटिक मुलांच्या आईवडिलांनी असे खचून न जाता आपल्या अपत्याचा रस कशात आहे हे शोधून काढून आपल्या पाल्याला संधी आणि योग्य ते प्रशिक्षण मिळवून दिले तर ही मुले नक्कीच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच असते. त्यामुळे तुम्ही जयला प्रोफेशनल कोचिंग देण्याची संधी मला दिलीत तर मला खूप आनंद होईल".

हे ऐकून नारायणीला आणि वीरेंद्रला तर खूप आनंद झाला. पण प्रश्न हा होता की जय तर अनोळखी व्यक्तींकडे बघत सुद्धा नसे,मग प्रकाश सर कसे त्याला शिकवणारत्यावरही प्रकाश सरांनी उपाय शोधून काढला. ते रोज सकाळी जयच्या स्विमिंगच्या वेळेला सोसायटीच्या स्विमिंग पूल वर येत असत. हळूहळू जयची त्यांच्याशी ओळख झाली. आणि आता प्रकाश सरांनी नारायणीला जयला त्यांच्या स्विमिंग पूलवर घेऊन येण्यास सांगितले. 

साशंक मनाने नारायणी जयला घेऊन प्रकाश सरांच्या स्विमिंग पूल वर घेऊन गेली खरी,पण तिथले अनोळखी लोक बघून ,खूप सारी मुले बघून जय घाबरला,गोंधळला. अस्वस्थ झाला. नारायणीने त्याला कसेबसे शांत केले. इकडे जयला बघून इतर मुलांना त्याच्यात काहीतरी विचित्र वाटले. अनेक पालकांनी व प्रकाश सरांच्या सहाय्यकांनी प्रकाश सरांना वेड्यात काढले.  जो मुलगा बोलण्याला प्रतिसादच देऊ शकत नाही, त्याला प्रोफेशनल स्विमिंगचे कोचिंग देणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे अनेकांचे मत होते. पण काही जागरूक पालकांनी मात्र ह्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि जयविषयी कौतुक व्यक्त केले. प्रकाश सरांनी सुद्धा जयविषयी त्यांच्या बॅच मधील मुलांना जयविषयी समजावून सांगितले. लहान मुले जात्याच प्रेमळ असतात, त्यामुळे त्यांनीही आपल्या ह्या नव्या "खास" मित्राला मदत करण्याचे ठरवले. नारायणी रोज जयला पूलवर घेऊन यायची. हळूहळू जयची त्या जागेशी ओळख झाली आणि त्याचे प्रकाश सरांकडे कोचिंग सुरु झाले. दरम्यान इकडे त्याची थेरपी सुद्धा सुरुच होती.

हळूहळू जय प्रगती करू लागला. आणि प्रकाश सरांनी त्याला विविध स्पर्धांमध्ये उतरवण्यास सुरुवात केली. लहान लहान स्पर्धांपासून सुरुवात करत जयने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय ,राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आणि त्याची पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा त्याने घवघवीत यश मिळवून प्रकाश सरांचा विश्वास सार्थ करून दाखवला. नारायणी आणि वीरेंद्रला तर आकाशच ठेंगणे झाले होते. पण सगळ्या प्रसिद्धी आणि गोंगाटापासून लांब असलेला जय मात्र शांतपणे आपला स्विमिंगचा सराव करण्यात मग्न होता.

ऑटिस्टिक मुलांच्या सेंटरवरील जयचे मित्र सुद्धा एव्हाना आपली चमक दाखवू लागले होते. जयच्याच बरोबर असलेला पार्थ एक उत्तम चित्रकार झाला होता. रंगांमधून तो आपल्या भावना व्यक्त होता, तर ह्या दोघांची मैत्रीण असलेली सिया , मोती व मण्यांशी खेळत उत्तम ज्वेलरी डिझायनर झाली होती.  आईच्या मदतीने ती आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस करत होती. तिच्या ज्वेलरीला परदेशातून सुद्धा मागणी येत होती.

ही लेकरं कुठेही अपूर्ण नाहीत, तर परिपूर्ण आहेत. देवाने जरी ह्या लेकरांना भावना बोलून दाखवण्याची शक्ती दिली नसली तरी ही मुलं कुठेही कमी नाहीत. त्यांना योग्य ती संधी मिळाल्यास,त्यांना समजून घेऊन हळुवारपणे त्यांना शिक्षण दिल्यास ही मुले खरोखर काहीतरी ग्रेट करून दाखवतात हे जयने आज दाखवून दिले होते. जयचे हे यश बघून एरवी त्याला नावे ठेवणारी, टोमणे मारणारी , त्याला नको ती लेबलं लावणारी माणसे आज लगेच रंग बदलून त्याचे अभिनंदन करीत होती. पण लोक असेच असतात हे एव्हाना चांगलेच कळून चुकलेल्या नारायणीने ह्या सर्व लोकांना मोठ्या मनाने माफ करून टाकले होते.

नारायणी व वीरेंद्रसारखे अनेक पालक आपल्या खास मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावेत म्हणून सतत झटत आहेत. जय सारखी मानसिक अवस्था असणारे हे स्वमग्न सैनिक रोज असंख्य अडचणींना तोंड देत नव्याने काहीतरी शिकण्याचा ,काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुष्यातल्या अडचणींशी लढत आहेत. त्यांना शक्य तितका प्रतिसाद देत आईवडिलांची आशा जागृत ठेवत आहेत. पण समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे.  अश्या स्पेशल मुलांना आपण कमी न लेखता त्यांच्यातल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, त्यांना समजून घेऊन त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण दिले पाहिजे. त्यांची हेटाळणी न करता ,त्यांची खिल्ली न उडवता त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. आणि हे करण्यासाठी समाजात ऑटिझम आणि त्या अवस्थेशी निगडित समस्यांबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. ह्या सर्व फायटर्सना व त्यांच्या धीरोदात्त व प्रेमळ आईवडिलांना माझा सलाम!

तुम्हाला जयची कथा कशी वाटली हे नक्की कमेंट्समधून सांगा!